न्हावा शेवा बंदरातून सिगारेटचा कंटेनर जात; महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई

Spread the love

न्हावा शेवा बंदरातून सिगारेटचा कंटेनर जात; महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई

मुंबई – महसूल गुप्तचर संचालनालय, मुंबई विभागाच्या पथकाकडून न्हावा शेवा बंदरातून १०.०८ कोटी रुपयांच्या परदेशी सिगारेटचा कंटेनर पकडण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महसूल गुप्तचर संचालनालयच्या मुंबई विभागीय पथकाने संयुक्त अरब अमिराती बंदरातून आयात करण्यात आलेल्या मालाचे दोन कंटेनर पकडण्यात आले. यामधील एका कंटेनर मध्ये चिनी कापडाचे विणलेले गालिचे होते त्याचा वापर सिगारेट चा कंटेनर झाकण्यासाठी करण्यात आला होता तर दुसऱ्या कंटेनरमध्ये जुन्या व वापरलेल्या गालिच्यांचे ३२५ रोल होते ज्यात सिगारेटच्या एकूण ६७,२०,००० कांड्या लपवून ठेवलेल्या होत्या.

मुंबई विभागीय पथकाने कारवाई करून सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.जप्त करण्यात आलेल्या सिगारेट ची अंदाजे किंमत १०.०८ च्या आसपास असल्याचे पथकाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon