सोनसाखळी चोरणाऱ्या दोन इराणीना गुन्हे शाखा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
प्रकाश संकपाळ
ठाणे – वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखा-५ यांनी सोनसाखळी चोरणाऱ्या दोन इराणी ना जेरबंद केलं आहे. आसिफ शब्बीर सैय्यद आणि बागर आसिफ सैय्यद अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी इंदिरानगर नाका परिसरातून या दोघांना अटक करून त्यांच्याकडील सोनसाखळी सह मोटर सायकल व चोरीचे दाखल असलेले १४ गुन्हे उघडकीस आणले. त्यांच्याकडून १४१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दोन मोटर सायकल असा एकूण ५,४०,०००/-रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची धडाकेबाज कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, पोलीस आयुक्त शोध-१(गुन्हे) निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-५ व वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके आणि त्यांच्या पथकाने केली.