तिहेरी हत्याकांडाने ठाणे जिल्हा हादरला ; क्रिकेटच्या बॅटने तिघांची हत्या

Spread the love

तिहेरी हत्याकांडाने ठाणे जिल्हा हादरला ; क्रिकेटच्या बॅटने तिघांची हत्या

विशेष प्रतिनिधी

ठाणे – तिहेरी हत्याकांडाने ठाणे जिल्हा हादरला आहे. पतीने क्रिकेटची बॅट डोक्यात घालून आधी पत्नीला संपवलं. त्यानंतर दोन लहान मुलांचाही जीव घेतला. कासारवडवली येथे ही धक्कादायक घटना घडली. आरोपीचे नाव अमित धर्मवीर बागडी असे आहे. मागील दोन दिवसांपासून तो भाऊ विकास घधर्मवीर बागडी याच्याकडे राहत होता. २९ वर्षीय अमित याने बायको आणि दोन मुलांना क्रिकेटच्या बॅटने संपवलं. जयवंत निवृत्ती शिंगे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हत्येनंतर आरोपी अमित हा पळून गेलेला आहे, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आरोपी अमित धर्मवीर बागडी हा मूळचा हरियाणातील खरडालीपुर येथील आहे. तो तीन ते चार दिवसांपासून ठाण्यात भावाकडे राहत होता. अमित बागडी याला दारुचं व्यसन होतं. तो कोणताही व्यावसाय करत नव्हता. घरगुती कारणामुळे हत्या झाल्याची प्रथमिक महिती समोर आली आहे. अमित बागडी याने पत्नी भावना (२४) हिला आधी संपवलं. त्यानंतर ६ वर्षांची मुलगी आणि ८ वर्षांच्या मुलालाही त्याने डोक्यात प्रहार करून संपवलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास धर्मवीर बागडी हा आरोपीचा सख्खा भाऊ असून तो ठाण्यात साईनगर कासारवडवली येथे २ वर्षे राहिला होता. त्यानंतर जयवंत शिंदे चाळ रूम नंबर एक कासारवडवली गाव येथे गेल्या ७ वर्षापासून राहत आहे. आरोपी अमित बागडी याला दारू पिण्याचे प्रचंड व्यसन होते. त्यामुळे पत्नी भावना आणि अमित यांच्यात वारंवार भांडणं होतं होती. नवऱ्याच्या दारुच्या व्यसनामुळे ती त्याला सोडून विकास बागडी सोबत राहत होती. मयत व्यक्ती भावना ही सख्या लहान दिरासोबत वास्तव्यास राहत होती. घटना घडली त्या ठिकाणी दोन मुलांच्या सोबत राहत होती. गेले तीन दिवसापासून आरोपी मयत व्यक्ती हिचा पती आणि दोन मुले यांना भेटण्यासाठी म्हणून घरी आला होता. त्यांच्यासोबत तो राहत होता. आज सकाळी आरोपीचा भाऊ विकास बागडी हा नेहमीप्रमाणे सात वाजता त्याच्या हाउसकीपिंगच्या कामासाठी निघून गेला. त्याच्यानंतर साधारण साडेअकराच्या सुमारास तो घरी परतला, तेव्हा त्याला घरात भावना तसेच दोन मुले हे मृत अवस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्याजवळ क्रिकेटची बॅट दिसून आली. त्याने ताबडतोब कासारवडवली पोलीस ठाण्यात कळविले असता पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला. कासारवडवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत रोकडे अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon