बिबट्याचा ५ वर्षाच्या मुलीवर हल्ला
पुणे – लोणीकंद हद्दीतील बुरकेगाव गावात बिबट्याने एका ५ वर्षाच्या मुलीवर (उस्मानाबाद येथील, सध्या आळंदीजवळ मरकळ येथे राहतात) हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी जखमी झाली असून तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
५ वर्षाच्या मुलीवर हल्ला करून बिबट्या उसाच्या शेतात गायब झाला .मुलीला ससून रुग्णालयात हलवण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी संपूर्ण अंधार असल्याने नक्की बिबट्यानेच हल्ला केला की आणखी कोणत्या प्राण्याने हल्ला केला याचा तपास सुरु करण्यात आला आहे. यासाठी स्टाफसह ३ सहायक पोलीस निरीक्षक आणि वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पग मार्क्स तपासण्यात येत आहेत. आधुनिक उपकरणांसह सज्ज बचाव पथक आज या ऑपरेशनमध्ये सहभागी होईल. कॅमेरा ट्रॅप व थर्मल ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याचा माग काढतील.