चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
दिनेश जाधव : डोंबिवली
डोंबिवली : गेले काही दिवसा पूर्वी डोंबिवली पूर्वेकडील भोपर परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका व्यक्तीला धक्काबुक्की करत त्याच्या गळ्यातील चैन खेचून त्याला फरफटत नेत जखमी केल्याचा गुन्हा कल्याण मानपाडा पोलीस ताकद दाखल झाला होता याप्रकरणी कल्याण झोन तीन चे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुऱ्हाळे, मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, पोलीस अधिकारी सुनील तारमळे, पोलीस अधिकारी अविनाश वनवे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाच्या तपास सुरू करत सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे वारिस खान, मोहम्मद कुरेशी नावाच्या दोन आरोपीना कल्याण जवळील आंबिवली परिसरातून ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता हे आंबिवली परिसरातील इराणी वस्तीत राहणाऱ्या चोरट्यांकडून ते चैन स्नेचिंग कशी करायची हे शिकले व त्यानंतर त्यांनी चोऱ्या सुरू करत मानपाडा, डोंबिवली, विष्णुनगर, महात्मा फुले, कल्याण तालुका, कोळशेवाडी व नवी मुबई पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिलीं सध्या पोलिसांनी एकूण नऊ गुन्ह्याचे उघडकीस आणून .या दोघांकडून पोलिसांनी आठ लाख पंधरा हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व एक मोटरसायकल हस्तगत केली आहे अजून यांनी अशा प्रकारे कुठे कुठे सूर्य केलेत याचा तपास मानपाडा पोलीस करत आहे.