वारकरी संप्रदायावरील वक्तव्य भोवले; विकास लवांडे अटकेत

वारकरी संप्रदायावरील वक्तव्य भोवले; विकास लवांडे अटकेत

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे : वारकरी संप्रदायात घुसखोरी झाल्याचा दावा करून वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लवांडे यांनी काही कीर्तनकारांवर भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप करत नावे जाहीर केली होती. त्यानंतर वारकरी संप्रदायातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रकरणात त्यांना यापूर्वी अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला होता. मात्र, प्रलंबित गुन्ह्यांची माहिती न्यायालयासमोर न दिल्याने पुणे न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती समोर आली.

अटकेनंतर लवांडे यांनी पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. दरम्यान, कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी कारवाईचे स्वागत करत लवांडेंवर कठोर कारवाईची मागणी केली.

यापूर्वी लवांडे यांच्यावर शाईफेक प्रकरणही घडले होते. या प्रकरणी काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon