तुर्भेत महिलेची हत्या करून दागिने लुटणारा आरोपी २४ तासांत जेरबंद

तुर्भेत महिलेची हत्या करून दागिने लुटणारा आरोपी २४ तासांत जेरबंद

योगेश पांडे / वार्ताहर 

नवी मुंबई : तुर्भे परिसरातील ६० वर्षीय महिलेची हत्या करून तिचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या मोबिन नूर कुरेशी याला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलेच्या अंत्यसंस्कारावेळी नातेवाईकांनी काही काळ आंदोलन केले.

तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चिकन दुकानात काम करत होता. कर्जबाजारी झालेल्या आरोपीने महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांवर डोळा ठेवून लुटीचा कट रचला होता.

महिला विसरभोळी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिला चहाच्या बहाण्याने घरी बोलावले. दागिने हिसकावण्याच्या प्रयत्नाला विरोध झाल्यानंतर आरोपीने तिच्याच दुपट्ट्याने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून घराबाहेर ठेवण्यात आला होता.

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon