फटका पॉइंटवर मोबाईल हिसकावणारा चोरटा जेरबंद

फटका पॉइंटवर मोबाईल हिसकावणारा चोरटा जेरबंद

योगेश पांडे / वार्ताहर

कल्याण : शहाड-आंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यानच्या ‘फटका पॉइंट’वर प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला कल्याण जीआरपीने अटक केली. इमरान इराणी असे अटक आरोपीचे नाव आहे.

उत्तर प्रदेशकडे जाणारी अंत्योदय एक्स्प्रेस शहाड स्थानक ओलांडल्यानंतर दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशाच्या हातावर आरोपीने बांबूने फटका मारला. त्यामुळे मोबाईल खाली पडताच आरोपी तो घेऊन पसार होण्याचा प्रयत्न करत होता.

घटनास्थळी तैनात असलेले जीआरपी कर्मचारी अक्षय पाटील यांनी तत्काळ पाठलाग करून आरोपीला पकडले. मात्र, सुटकेसाठी आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी तेथून जात असलेले आरपीएफ जवान अमित कुमार यांनी मदत करत आरोपीला जेरबंद केले.

या प्रकरणी कल्याण जीआरपीने गुन्हा दाखल केला असून आरोपीकडून यापूर्वीच्या गुन्ह्यांचाही तपास सुरू आहे. शहाड-आंबिवलीदरम्यानचा ‘फटका पॉइंट’ परिसर मोबाईल चोरीच्या घटनांसाठी कुप्रसिद्ध मानला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon