देहुरोडमध्ये सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव; दोन महिलांविरुद्ध गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : देहुरोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून शांतता भंग केल्याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहुरोड पोलीस स्टेशन पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-बेंगलोर जुन्या महामार्गावरील स्वर्ग लॉजसमोर, लेखा फार्मजवळ संबंधित महिला वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी लैंगीक हावभाव करत होत्या. तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करून सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचवत असल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम, १९५६ च्या कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस शिपाई समाधान विष्णु पटावकर यांनी फिर्याद दिली असून पोलीस हवाल्दार क्षिरसागर पुढील तपास करत आहेत.
सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य सभ्यतेचा भंग करणारे असून नागरिकांनी संशयास्पद हालचालींबाबत तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.