सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर वर्तकनगर पोलिसांची मोठी कामगिरी; चोरीची इको कार हस्तगत, आरोपी अटकेत

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर वर्तकनगर पोलिसांची मोठी कामगिरी; चोरीची इको कार हस्तगत, आरोपी अटकेत

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : वर्तकनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे चोरीस गेलेली इको कार हस्तगत करत आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे परिसरातील वाहनचोरीच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पोलिसांनी केलेल्या सखोल तपासादरम्यान आरोपीने आणखी तीन कार चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे. आरोपीकडून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

या संपूर्ण कारवाईत सतत चार दिवस सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करून आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलीस शिपाई सस्ते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या चिकाटी आणि तांत्रिक कौशल्याचे वरिष्ठांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.

वर्तकनगर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon