धरणगाव पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह आरोपी अटकेत

धरणगाव पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह आरोपी अटकेत

पोलीस महानगर नेटवर्क

धरणगाव : अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात धरणगाव पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर कारवाई करत गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूसासह एका आरोपीला जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.

गुप्त माहितीच्या आधारे धरणगाव पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून गावठी पिस्तुल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी आरोपीविरोधात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास धरणगाव पोलीस करत असून आरोपीकडून आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

धरणगाव पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा माहिती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

📞 धरणगाव पोलीस संपर्क : ०२५८८-२५१३३३
🚨 आपत्कालीन मदत : Dial 112

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon