एसीतून गार हवा सुरू असताना अचानक झाला स्फोट; आगीमध्ये २ घरांचा कोळसा, कल्याणमधील घटनेने परिसरात खळबळ

एसीतून गार हवा सुरू असताना अचानक झाला स्फोट; आगीमध्ये २ घरांचा कोळसा, कल्याणमधील घटनेने परिसरात खळबळ

योगेश पांडे / वार्ताहर 

कल्याण – कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरातील एका उच्चभ्रू इमारतीच्या पाचव्या मजल्यावर गुरूवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. घरातील एसीचा स्फोट झाल्यामुळे आगीचा भडका उडाला आहे. या आगीच्या दुर्घटनेमध्ये, कोणतीही जीवितहानी नाही. आगीने रौद्र रूप घेतल्यामुळे ही आग वरच्या मजल्यावर सुद्धा पोहोचली होती. कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

दरम्यान, आगीच्या ज्वाळा इतक्या मोठ्या प्रमाणावर होत्या की, ही आग सहाव्या मजल्यावरही पोहोचली. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणाणावर असल्यामुळे सहाव्या मजल्यावरील घराचे सुद्धा नुकसान झाले आहे. एसीच्या स्फोटामुळे पाचव्या मजल्यावरील आणि सहाव्या मजल्यावरील दोन्हीही फ्लॅटचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जरीही दोन्हीही फ्लॅट्सचे नुकसान झाले असले तरीही या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागली त्यावेळी हॉलमध्ये कोणीही नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

आगीची घटना कळताच तात्काळ घटनास्थळी येऊन काही वेळातच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि आग आणखीन पसरण्यापासून रोखली. सध्या संपूर्ण घटनेची चौकशी केली जात आहे. आगीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच कल्याण पश्चिमेतील बारावे कचरा प्रकल्पाला आग लागल्याची घटना घडली होती. आग लागल्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर धुर पसरला होता. या आगीच्या दुर्घटनेमुळे लहान मुलं, वृद्ध व्यक्तींना आणि श्वासोच्छवास संबंधित आजार असणाऱ्या लोकांना श्वास घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर समस्या होत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon