मुंबईत एनसीबी ची मोठी कारवाई, १७४५ कोटींचा कोकीन साठा जप्त; अमित शाहंकडून टीमचं कौतुक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोकीनचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या टीमने मिळालेल्या टीपच्या आधारावर ही कारवाई केली. ३४९ किलोग्रॅम कोकीन जप्त केलं. एनसीबी ने जप्त केलेल्या या कोकीनची बाजारातील अंदाजित किंमत १७७५ कोटी आहे. नशेच्या पदार्थाचा इतका मोठा साठा कुठून आला? कोणी आणला? कुठे जाणार होता? हा तपासाचा विषय आहे. कोकीनचा एवढा मोठा साठा पकडल्याने एनसीबी ची टीम सुद्धा चक्रावून गेली आहे. कोकीन जप्तीसह आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केल्याचा दावा एनसीबीने केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या कारवाईसाठी एनसीबी ला शुभेच्छा दिल्या आहेत.
एनसीबी च्या या यशाबद्दल अमित शाह यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. नशा तस्करी विरोधात कठोर कारवाई सुरु ठेवण्याचा संकल्प बोलून दाखवलाय. त्यांनी एक्सवर लिहिलय की, एनसीबीने मुंबईत मोठी कारवाई केली. ३४९ किलो हायग्रेड कोकीन जप्त केलं. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १७४५ कोटी रुपये आहे. हे ऑपरेशन म्हणजे एजन्सीच्या बॉटम टू टॉप अप्रोचच उदहाण आहे. सरकार ड्रग कार्टेलला मूळापासून संपवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.