मंगलप्रभात लोढांच्या मागणीला यश; केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडूनही हिरवा कंदील

मंगलप्रभात लोढांच्या मागणीला यश; केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडूनही हिरवा कंदील

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडूनही हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. केईएम ह़ॉस्पिटलचे जूने नाव बदलुन कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असे करण्याकरता मंगलप्रभात लोढांनी महापौरांना पत्र दिले होते. आरोग्य समितीकडे हा प्रस्ताव आल्यानंतर तो मंजूर करुन आयुक्तांकडे अभिप्राया करता पाठवला गेला होता, आता आयुक्तांनीही या नामांतर प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे.

मुंबईतील प्रसिद्ध किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराच्या प्रस्तावाला आता महानगरपालिका प्रशासनाने अधिकृतपणे हिरवा कंदील दाखवला आहे. या निर्णयामुळे आता केईएम रुग्णालयाचे नाव बदलून ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ असे होणार आहे. रुग्णालयाचे नाव बदलण्याबाबत राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापौरांना पत्र लिहून मागणी केली होती. हा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीकडे पाठवण्यात आला होता. आरोग्य समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर तो अंतिम अभिप्रायासाठी पालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता. आता आयुक्तांनीही या नामांतराला संमती दर्शवली आहे.

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्याच्या या निर्णयाला सुरुवातीपासूनच राजकीय स्तरावर विरोध होत होता. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या नामांतराच्या प्रस्तावाला जोरदार विरोध दर्शवला होता. मात्र, प्रशासकीय पातळीवर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की, आरोग्य समितीचा निर्णय अंतिम राहील. शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या विराेधाला न जुमानता हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

बदलत्या काळानुसार आणि स्वदेशी विचारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने १९२६ मध्ये स्थापन झालेल्या या ऐतिहासिक संस्थेचे नामांतर करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. दरम्यान, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी २९ मार्च २०२६ला आरोग्य समितीकडे पत्र पाठवून नामांतराची मागणी केली होती. त्यानुसार केईएम रुग्णालयाला एकलव्याच्या नावाशी निगडित नवीन ओळख देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला हाेता. केईएम या नावाने जगभरात या रुग्णालयाची ओळख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon