नाशिक पाठोपाठ मुंबईतही कॉर्पोरेट जिहाद?
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीला अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – नाशिक जिल्ह्यात भोंदूगिरीच्या घटनांचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीये. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच, आता निफाड तालुक्यातील धरणगाव (खडक) येथील एका स्वयंघोषित बाबाचे संतापजनक कृत्य समोर आले आहे. तर दुसरीकडे नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरणाचे प्रकरण आता अधिक गंभीर वळणावर आले आहे. एकंदरीत नाशिकमध्ये घडलेल्या या घटनांचे प्रकरण राज्यात गाजत असताना नाशिक पाठोपाठ आता मुंबईतही कॉर्पोरेट जिहाद होतोय का? असा प्रश्न पडला आहे. त्याला कारण ठरलंय ती आग्रीपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली एका पीडित तरुणीची तक्रार. बांधकाम क्षेत्रातील एका कंपनीत काम करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीला काही महिन्यांपूर्वी सोबत काम करणाऱ्या तरुणाने अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अश्रफ नावाच्या तरुण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, यात पीडित तरुणीकडून तिच्या फोटोंची मागणी करण्यात आली आहे. यातील तरुणीशी ‘लव्ह फ्रेंडशिप’ करून लॉजवर जाऊन शारीरिक संबंध करण्याची आरोपीने फोनवर इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे. तरुणीच्या मैत्रिणींसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोपीने दावा केल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. तसेच तक्रारदार तरुणी हिंदू असल्याच तिच्या मैत्रिणी सांगताच ‘आज कल हिंदू लडकी को मुस्लिम पसंद है’ असा आरोपीने दावा केल्याचा देखील एफआयआरमध्ये उल्लेख आहे.
दरम्यान, या प्रकरणी अश्रफ नावाच्या तरुणाविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार, पाठलाग करणे तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणी फेब्रुवारी महिन्यात बांधकाम क्षेत्रातील एका कंपनीत महालक्ष्मी येथे टेलीकॉलर म्हणून काम करत होती. यात कंपनीच्या व्हाट्सअप ग्रुपमधून संशयित आरोपीने तरुणीचा मोबाईल नंबर मिळवला. त्यांनतर कॉलकरून संपर्क साधला. यावेळी पीडित तरुणीने शेजाऱ्याच्याचा मोबाईल घेऊन व्हाट्सअप कॉल रेकॉर्ड केले. परिणामी तरुणीच्या प्रसंगावधानपणामुळे आरोपीचे पितळ उघडं पडलंय. यावेळी इतर मुलींचे फोटो पाठवून त्यांच्याशी देखील शारीरिक संबंध केल्याचा आरोपीने फोनवर दावा केल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख आहे. परिणामी पोलिसांनी केलेल्या तपासात इतरही तरुणींना अशाच प्रकारचे कॉल केल्याच तपासात उघड झालं आहे.