एका दिवसात १२०० नागरिकांची कामे मार्गी; चेंबूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भव्य शिबिर

Spread the love

एका दिवसात १२०० नागरिकांची कामे मार्गी; चेंबूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भव्य शिबिर

रवि निषाद / प्रतिनिधी

मुंबई : चेंबूरमधील टिळकनगर येथील डायमंड वेंकट सभागृहात १० एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आयोजित करण्यात आलेल्या विशेष शासकीय शिबिरात तब्बल १२०० नागरिकांची विविध कामे एकाच दिवशी मार्गी लावण्यात आली. या उपक्रमामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

या शिबिरात आधार कार्ड, उत्पन्न दाखला, डोमिसाइल प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, एसआयआरसह विविध शासकीय कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जलदगतीने तयार करून देण्यात आली. चेंबूर व कुर्ला विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला उत्तर मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई, कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडालकर, चेंबूरचे आमदार तुकाराम काते, उपविभागीय अधिकारी कल्पना गोडे, तहसीलदार दिलीप रायन्नावर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

मंडळ अधिकारी रंजना राठोड यांनी सांगितले की, “या उपक्रमातून नागरिकांची विविध कामे एका छताखाली जलदगतीने पूर्ण करण्यात आली. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचला.” कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले.

या शिबिरात सहभागी नागरिकांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon