भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची पहिली विकेट; मुख्यमंत्री कार्यालयाकडून मोठ्या हालचाली, सूत्रांची माहिती

Spread the love

भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची पहिली विकेट; मुख्यमंत्री कार्यालयाकडून मोठ्या हालचाली, सूत्रांची माहिती

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – नाशिकचा भोंदू अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून राज्यात संतापाची लाट उसळली आहे. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी या खरातची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. तर त्याच्यासोबतचे छत्री धरलेला फोटोही समोर आला होता. त्यानंतर चाकणकर यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. याप्रकरणात अनेक महिलांचे लैंगिक शोषण झाल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा दोन दिवसात राजीनामा घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. सीएमओ कार्यालयाने या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा येत्या दोन दिवसात राजीनामा घेण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. सीएमओ कार्यालयाकडून याप्रकरणी गंभीर दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी अगोदरच आयपीएस तेजस्विनी सातपुतेंच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली असून त्याद्वारे सखोल तपास करण्यात आले आहे. तर चाकणकर यांच्यावर येत्या दोन दिवसात कारवाई करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे.

रुपाली चाकणकरांना तातडीने अटक करण्याची मागणी उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे. तसेच चाकणकरांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही त्यांनी केली. तर खरात आणि चाकणकर यांचे व्यावसायिक संबंध होते का, याविषयी तपास करण्याची मागणी त्यांनी केली. तर या सर्व प्रकरणात ज्यांची नावे समोर येत आहे, त्यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली. चाकणकर या तंत्रमंत्र करायच्या, त्यांनी अनामिका कापल्याचा धक्कादायक दावाही अंधारे यांनी केला आहे.

भोंदू अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाचे ५८ नाहीतर १०० पेक्षा अधिक व्हिडीओ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये आयपीएस तेजस्विनी सातपुतें यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीतील पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली आहे. खरातची झाडाझडती सुरू असून त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आता याप्रकरणात सरकार कुणा कुणाला अटक करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon