ग्रामीण पुण्यात बेपत्ता तरुणाची निर्घृणपणे हत्या; मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ

Spread the love

ग्रामीण पुण्यात बेपत्ता तरुणाची निर्घृणपणे हत्या; मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जैदवाडी परिसरात एका तरुणाची निर्घृणपणे हत्या केली. गेल्या तीन दिवसांपासून तरुण बेपत्ता असल्याची माहिती आहे. मृत तरुणाचे नाव धनंजय मारुती घेवडे (३३) असे आहे. तरुणाचा मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. तरुण हा मूळ आंबेगाव तालुक्यातील करेगावचा रहिवासी होता, सध्या तो राक्षेवाडी येथे वास्तव्यास होता.

घडलेल्या घटनेनुसार, १६ मार्च रोजी रात्री ९ वाजल्यापासून धनंजय घेवडे बेपत्ता होते. कुटुंबीयांकडून त्यांचा शोध घेणं सुरु होता. गुरुवारी सकाळी ११ वाजताना जैदवाडी परिसरात निर्जनस्थळी त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेह हा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. तसेच धारदार शस्त्राने तोंडावर सपासप वार करण्यात आल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं.

घटनास्थळी मृतकाची दुचाकी आढळून आली. हल्ल्याची क्रूरता लक्षात घेता नियोजनपूर्व हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच, खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास केला. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. या घटनेनं जैदवाडी आणि इतर परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. आरोपींनी लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon