मरोळ पोलीस कॅम्पमध्ये भरतीसाठी आलेली मुलं उतरली रस्त्यावर; सरकारविरोधात घोषणाबाजी

Spread the love

मरोळ पोलीस कॅम्पमध्ये भरतीसाठी आलेली मुलं उतरली रस्त्यावर; सरकारविरोधात घोषणाबाजी

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ पोलीस कॅम्पमध्ये सुरु असलेल्या पोलीस भरतीमध्ये मुलांनी मंगळवारी मोठा गोंधळ घातला. पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांनी रस्त्यावर उतरुन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस भरतीसाठी मंगळवारी शेवटचा दिवस होता, अशा स्थितीत मुलांना सकाळपासून मैदानी चाचणीसाठी आतमध्ये न घेतल्यामुळं मोठा गोंधळ निर्माण झाला. गेल्या दोन दिवसापासून पोलीस भरतीसाठी मुलं मरोळ पोलीस कॅम्प बाहेर रस्त्यावर उभी होती. अखेर मंगळवारी शेवटी आंदोलन केल्यानंतर मुलांना यश मिळालं. मुलांना ग्राउंड मैदानी चाचणीसाठी आतमध्ये घेतलं.

मरोळ पोलीस कॅम्पचा मुख्य रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे मुख्य रस्ता बंद आहे. त्यामुळं मुलं रस्त्यावर उतरल्यामुळे आजूबाजूचे सोसायट्यांचा गेट सुद्धा बंद झालं. मरोळ पोलीस कॅम्पचा आजूबाजूचा राहणाऱ्या लोकांना या गोंधळामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. पोलिसांच्या नियोजनअभावी हा गोंधळ झाला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

पोलीस भरतीसाठी आलेला सर्व मुलांना पोलिसांनी रस्त्यावरुन मैदानी चाचणीसाठी आतमध्ये घेतलं. सकाळपासून आतमध्ये न घेतल्यामुळे मुलांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता रस्त्यावर थांबून त्यांनी गोंधळ घातला. यानंतर मोठ्या संख्येमध्ये मरोळ पोलीस कॅम्प बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. आंदोलनकर्त्या सर्व मुलांना रस्त्यावरुन मैदानावर घेण्यात आलं. त्यामुळं मरोळ मरोशी रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी सुरळीत सुरु झाला.

मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी आलेला मुलांनी मरोळ पोलीस कॅम्प बाहेर मोठा गोंधळ घातला. मरोळ पोलीस कॅम्प समोर काही मुलांनी रस्त्यावर थांबून आंदोलन केलं. मुंबई पोलीस दलात शिपाई पदासाठी मंगळवारी शेवटचा दिवस होता. मात्र यामध्ये काही मुलांना ईमेल द्वारे बोलावण्यात आलं होतं, तर काही मुलांना ई-मेलच्या माध्यमातून संपर्क केला नसल्याचे समोर आले आहे. यामुळं भरतीसाठी आलेल्या मुलांनी रस्त्यावर थांबून आंदोलन केलं. आंदोलन पाहता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रस्ता मोकळा करून पुन्हा सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon