मुंबई श्री बॉडीबिल्डिंग स्पर्धेत पोलीस शिपाई रेखा शिंदे यांची सलग तिसऱ्यांदा बाजी; प्रथम क्रमांक पटकावत ‘मुंबई श्री’ किताब कायम

Spread the love

मुंबई श्री बॉडीबिल्डिंग स्पर्धेत पोलीस शिपाई रेखा शिंदे यांची सलग तिसऱ्यांदा बाजी; प्रथम क्रमांक पटकावत ‘मुंबई श्री’ किताब कायम

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित “मुंबई श्री” बॉडीबिल्डिंग स्पर्धेत मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या म.पो.शि./२०२ रेखा बापूराव शिंदे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या विजयानंतर त्यांनी सलग तिसऱ्या वर्षी ‘मुंबई श्री’ टायटल जिंकण्याचा मान मिळवला आहे.

पोलीस सेवेत कार्यरत असतानाच कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर रेखा शिंदे यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशामुळे पोलीस दलासह मुंब्रा परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रेखा शिंदे यांच्या या दिमाखदार यशाबद्दल सहकारी, वरिष्ठ अधिकारी तसेच क्रीडा क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या जिद्द, मेहनत आणि समर्पणाला सर्वत्र सलाम केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon