मानपाडा पोलिसांची तत्परता; हरवलेले चार पासपोर्ट मालकाच्या ताब्यात सुपूर्द

मानपाडा पोलिसांची तत्परता; हरवलेले चार पासपोर्ट मालकाच्या ताब्यात सुपूर्द

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : मानपाडा पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे हरवलेले चार पासपोर्ट सुरक्षितपणे मालकाच्या ताब्यात देण्यात आल्याची घटना घडली. पोलिसांच्या या प्रामाणिक व तत्पर कामगिरीबद्दल संबंधित नागरिकांनी आभार व्यक्त केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मानपाडा पोलीस ठाण्याच्या गोपनीय पथकातील पोलीस अंमलदार रवींद्र जाधव आणि ऋषिकेश वारुळे यांना चार पासपोर्ट सापडले होते. या कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यात आला.

पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर हे पासपोर्ट श्री. श्रेणिक नवीनचंद्र वोरा यांचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सर्व पासपोर्ट सुरक्षितपणे वोरा यांच्या ताब्यात सुपूर्द केले.

मानपाडा पोलिसांच्या या प्रामाणिक व तत्पर कामगिरीबद्दल श्रेणिक वोरा यांनी पोलीस दलाचे आभार मानले असून पोलिसांच्या या कृतीचे नागरिकांकडूनही कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon