दहीसरमध्ये बाईक पार्क करण्याच्या वादातून युवकाची हत्या; तासाभरातच आरोपीला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – दहिसरमध्ये किरकोळ वादातून एका युवकाची चाकूने गळा कापून केली हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घराबाहेर बाईक पार्क करण्यावरून दोन्ही युवकांमध्ये होळीच्या दिवशी वाद झाला होता. याचाच राग मनात धरुन गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास चाकूने आरोपीने एका युवकाची गळा कापून हत्या केली आहे. एम.एच.बी पोलिसांकडून आरोपीला तासाभरातच अटक करण्यात आली आहे.
दहिसर पश्चिम येथील गणपत पाटीलनगर गल्ली नंबर ५ मध्ये होळीच्या दिवशी घरा बाहेर बाईक पार्क करण्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून गुरुवारी एका युवकाची हत्या झाली आहे. सकाळी पावणे ११ वाजता दहिसर पश्चिम गणपत पाटील नगर गल्लीत झालेल्या भांडणात चाकू हल्ला झाला आहे. मृत युवकाचे नाव भरत आढाव असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच एमएचबी पोलिसांची तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. हत्या करणाऱ्या आरोपी कृष्णा राजा यादव याला एम.एच.बी पोलिसांनी अवघ्या १ तासात केली अटक केली आहे. हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे का याचा तपास सुरु आहे. यापूर्वीही या परिसरात ट्रिपल मर्डरची घटना घडली होती. या घटनेमुळं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.