पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात आग, अग्निशमन दलाची धाव; जाळ अन् धुराचे लोट

Spread the love

पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात आग, अग्निशमन दलाची धाव; जाळ अन् धुराचे लोट

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – देशभरातील, जगभरातील पर्यटकांचं आकर्षण असलेल्या पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात आग लागल्याने अनेकांची धांदल उडाली.शनिवार वाड्याजवळील देसाई कॉलेज समोर झाडाचा पाला पाचोळा व झाडाच्या फांद्यांना मोठ्या प्रमाणात आग लागली. आगीमुळे धुराचे लोटही पसरले.आगीची माहिती मिळताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली असून जवानांनी आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

सुदैवाने आगीत कुठलेही नुकसान झाले नसले तरी आग लागल्याने येथील वाळलेले गवत आणि पालापाचोळा, स्वच्छतेचा मुद्दा समोर आला आहे.आगीमुळे येथील ऐतिहासिक शनिवार वाड्याच्या एका दरवाजापर्यंत आगीचे लोट पोहोचले होते, मात्र त्यावरही पाणी मारण्यात आलं आहे.अग्निशमन दलाच्या गाडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.

शनिवार वाडा हे देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून भारताच्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्रातून दरवर्षी लाखो पर्यंटक पुण्यात शनिवार वाड्याल भेट देतात.बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या ऐतिहासिक संदर्भाच्या अनेक खुणा आजही शनिवार वाड्यात इतिहासाची साक्ष देतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon