वागळे इस्टेटमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : वागळे इस्टेट परिसरातील रोड क्रमांक २२ येथे पाचवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाणे यांनी २६ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित आरोपीविरोधात कडक पॉक्सो कायदा तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा नोंदविला. घटनेनंतर परिसरात भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.