पवई आयआयटीमध्ये सापडली
पाच जिवंत काडतुसे ; गेस्ट म्हणून आलेल्या बिहारच्या आरोपीला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – पवई आयआयटीमध्ये पाच जिवंत काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सर्वोत्तम आनंद चौधरी २३ वर्ष राहणार समस्तीपूर बिहार याला अटक करण्यात आली आहे. आय आय टी च्या एच १ हॉस्टल मध्ये जिवंत काडतुसे सापडली आहेत. १२ तारखेला गेस्ट म्हणून आरोपी आला होता. १९ तारखेला दोन विधार्थ्यांची दारु पिवून भांडणे झाली होती. त्यामुळं सुरक्षा रक्षकांनी शोध मोहीम घेतली असता आरोपीच्या बॅगेमध्ये जिवंत काडतुसे सापडली आहेत. आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबईच्या पवई आयआयटीमध्ये जिवंत काडतुसे सापडल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी २३ वर्षीय आरोपीला अटक करण्य़ात आली आहे. हा आरोपी हा बिहारचा आहे. तो गेस्ट म्हणून आला होता. त्याच्या बँहेत जिवंत काडतुसे सापडल्यानं खळबळ उडाली आहे.