चारित्र्याचा संशय ठरला जीवघेणा; तरुणाचा लिव्ह-इन पार्टनरसमोर धक्कादायक अंत

Spread the love

चारित्र्याचा संशय ठरला जीवघेणा; तरुणाचा लिव्ह-इन पार्टनरसमोर धक्कादायक अंत

योगेश पांडे / वार्ताहर

डोंबिवली – डोंबिवली परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मूळचा छत्तीसगडचा असलेल्या एका २३ वर्षीय तरुणाने ‘लिव्ह-इन पार्टनर’सोबत झालेल्या वादानंतर तिच्यासमोरच आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. गुरुवारी पोलिसांनी या घटनेची माहिती दिली.

ही घटना डोंबिवली (पूर्व) येथील मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगळवारी घडली. पिंटू देवा श्रीवास (२३) असे मृत तरुणाचे नाव आहे, तो मूळचा छत्तीसगडमधील महासमुंद येथील रहिवासी होता. २० वर्षीय प्रेयसीसोबत तो डोंबिवलीत भाडेतत्त्वावरील घरात राहत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंटूने दारूच्या नशेत आपल्या जोडीदारावर चारित्र्याचा संशय घेतला. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. संतापलेल्या पिंटूने तिला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर त्याने रागाच्या भरात काचेची बाटली फोडून स्वतःच्या छातीवर आणि मानेवर वार केले.एवढ्यावरच न थांबता पिंटूने तरुणीच्या कपड्याने गळफास लावून घेतला. या घटनेनंतर त्याला तातडीने डोंबिवलीतील शास्त्रीनगर सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon