कळवा पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोरीचा पर्दाफाश; आरोपी अटकेत

Spread the love

कळवा पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोरीचा पर्दाफाश; आरोपी अटकेत

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : कळवा परिसरात पायी जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने खेचून पळ काढणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत सोनसाखळी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कळवा पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा माग काढला. तपासादरम्यान आरोपीकडून १०.११० ग्रॅम वजनाची, सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन जप्त करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरलेली अंदाजे ३० हजार रुपये किमतीची मोटार स्कुटर आणि ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोनही पोलिसांच्या ताब्यात आला आहे.

या कारवाईत एकूण ३ लाख ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. पुढील तपास गुन्हे शाखा घटक क्रमांक ०१ कडून सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon