पुण्यत महिलेचा दगडाच्या खाणीत ढकलून खून प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीसांना अखेर यश; तिन्ही रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टोशनच्या हद्दीत एका महिलेचा दगडाच्या खाणीत ढकलून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी संबंधित महिलेला जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवून निर्जन ठिकाणी नेले. तेथे तिच्यावर काठीने मारहाण करण्यात आली. त्यानंतर एका आरोपीने तिला दगडाच्या खाणीत वरून ढकलून दिल्याचा आरोप आहे. तसेच, मयत महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सीसीटीव्हीमध्ये ओळख पटू नये यासाठी आरोपींनी रिक्षाचे हूड बदलल्याची बाबही तपासात समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास पुणे गुन्हे शाखा आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी संयुक्तपणे केला. अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने तिघा आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. सदर प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.
पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचा दगडाच्या खाणीत ढकलून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही विविध गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक तपासानुसार, आरोपींनी संबंधित महिलेला जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवून निर्जन भागात नेले. तेथे तिला काठीने बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर एका आरोपीने तिला दगडाच्या खाणीत उंचावरून खाली ढकलून दिल्याचं समोर आलं आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत सापडलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणात महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासानंतर याबाबत अधिकृत माहिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासादरम्यान आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी वापरलेल्या रिक्षाचे हूड बदलल्याचे उघड झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पुणे क्राईम ब्रांच आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी संयुक्तपणे केला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तिन्ही आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून अधिक चौकशी सुरू असून, गुन्ह्यामागील नेमके कारण शोधले जात आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपींविरुद्ध खून, अपहरण तसेच इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.