महाशिवरात्रीनिमित्त सायन-कोलीवाड्यात महाभंडारा; दहा हजारांहून अधिक भाविकांचा सहभाग

Spread the love

महाशिवरात्रीनिमित्त सायन-कोलीवाड्यात महाभंडारा; दहा हजारांहून अधिक भाविकांचा सहभाग

सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : महाशिवरात्रीच्या निमित्ताने सायन-कोलीवाडा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार तमिळ सेलवन यांच्या वतीने भव्य महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. उपवास करणाऱ्या भाविकांसह स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. दहा हजारांहून अधिक भाविक या महाप्रसादात सहभागी झाले होते.

गेल्या पंचवीस वर्षांपासून महाशिवरात्रीच्या दिवशी श्री सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसाद (भंडारा) आयोजित करण्याची परंपरा आमदार तमिळ सेलवन यांनी जोपासली आहे. यावर्षीही ही परंपरा कायम ठेवत भक्तांसाठी महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार तमिळ सेलवन यांनी, “हा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही. ही केवळ देवाची आणि भक्तांची सेवा आहे. महाशिवरात्रीला आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व असून सेवा हाच खरा धर्म आहे,” असे सांगितले.

महाभंडाऱ्यात केळीच्या पानावर पुरी, चणा भाजी, वेजिटेबल अवियल, मिक्स भाजी, पापड, भात, सांबार, रसम, पायसम आणि ताक आदी पदार्थ पंगतीत वाढण्यात आले. आमदारांसह कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी स्वतः उपस्थित राहून भाविकांना प्रसाद वाटप केले.

हा महाभंडारा सोमवार, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सेक्टर-२, काणे नगर, सीजीएस कॉलनी, अँटॉप हिल परिसरात, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. महाशिवरात्रीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने शिवभक्तांनी उपस्थित राहून या सेवाकार्यात सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon