गोरेगावमधील ४५ मजली इमारतीला आग; रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले

Spread the love

गोरेगावमधील ४५ मजली इमारतीला आग; रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबईतील गोरेगावमध्ये निवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे.गोरेगाव पूर्व येथील गोकुलधाम परिसरातील कृष्णा वाटिका रोडवरील डीबी वुड या ग्राउंड प्लस ४५ मजली इमारतीच्या नवव्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली.सकाळी ९.११ वाजता अग्निशमन दलाला माहिती मिळाल्यानंतर ९.२५ वाजता आगीला लेव्हल-१ घोषित करण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, आग बेडरूममध्ये लागून विजेची वायरिंग, इलेक्ट्रिक इंस्टॉलेशन आणि घरगुती साहित्यापर्यंतच मर्यादित होती.इमारतीतील रहिवाशांना सुरक्षितपणे रिफ्यूज एरिया व टेरेसवर हलविण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.घटनास्थळी चार फायर इंजिन, चार जंबो टँकर, अ‍ॅडव्हान्स वॉटर टँकर, टर्न टेबल लॅडर, हाय प्रेशर पंप व इतर बचाव साहित्य तैनात करण्यात आले.मुंबई अग्निशमन दल, पोलीस, वीज वितरण कंपनी व बीएमसी कर्मचारी यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon