प्रभावी तपासाची यशोगाथा : राबोडी पोलिसांनी हरविलेले ५२ मोबाईल शोधून नागरिकांना परत केले

Spread the love

प्रभावी तपासाची यशोगाथा : राबोडी पोलिसांनी हरविलेले ५२ मोबाईल शोधून नागरिकांना परत केले

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : राबोडी पोलीस ठाणे, ठाणे यांच्या वतीने सन २०२४–२०२५ या कालावधीत हरविलेल्या मोबाईल फोन प्रकरणांचा सखोल व प्रभावी तपास करण्यात आला. या तपासादरम्यान एकूण ५२ मोबाईल फोन (अंदाजे किंमत ₹५,१०,०००/-) यशस्वीरित्या शोधून काढण्यात आले असून ते मूळ मालकांना विधीपूर्वक हस्तांतरित करण्यात आले.

हरविलेल्या मोबाईल संदर्भातील तक्रारींची गांभीर्याने दखल घेत आधुनिक तंत्रज्ञान, IMEI ट्रॅकिंग व समन्वयात्मक तपास पद्धतीचा अवलंब करून ही उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व आनंद व्यक्त करण्यात येत असून राबोडी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ठाणे पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसह त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असून, भविष्यातही अशाच प्रभावी कारवाया राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon