बिनविरोध निवडीविरोधातील मनसे नेते अविनाश जाधवांची याचिका हायकोर्टाने फेटाळत याचिकाकर्त्यांना दंड ठोठावला
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांच्या बिनविरोध निवडीविरोधात मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दंड ठोठावला असून खडे बोल सुनावले. तुम्ही न्यायालयात सकाळी चुकीची विधानं केली. रिट पिटिशन आणि आधीच्या याचिकेत सार्धम्य असल्याचे सांगितले. मात्र, यामध्ये काहीही साम्य आढळून आलेले नाही. त्यामुळे आम्ही याचिकाकर्त्यांना दंड ठोठावत असल्याचे न्यायमूर्तींनी सांगितले.
बुधवारी सकाळी ही याचिका इतर प्रलंबित याचिकांसारखीच असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, सुनावणीसाठी याचिका पुकारण्यात आल्यानंतर ऑनलाईन उपस्थित असलेले असीम सरोदे यांनी सांगितले की ही याचिका तत्सम नसून निवडणुकीशी संबंधित आहे. यामुळे मुख्य न्यायाधीश श्री. चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम ए. अंखड यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. खंडपीठाने म्हटले, ही याचिका इतर याचिकांसारखीच असल्याचे चुकीचे विधान केल्याबद्दल आम्ही तुमच्यावर दंड लावणार आहोत आणि याचिका फेटाळणार आहोत, असे हायकोर्टाकडून सांगण्यात आले होते. आता सांगा, तुम्ही चुकीचे विधान का केले? एखाद्या पक्षकारासाठी अशी चुकीची माहिती देण्यामागे तुमची घाई किंवा भीती काय होती?, असा सवालही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला. शेवटी न्यायालयाने दंड न आकारता ही याचिका फेटाळून लावली.
राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये मतदान होण्यापूर्वीच ६६ उमेदवार विजयी झाले आहेत. निवडणुका बिनविरोध करण्यात भाजपाने आघाडी घेतली अजून आतापर्यत भाजपाचे ४४ उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. त्यापाठोपाठ निवडणुका बिनविरोध करण्यात शिंदेंच्या शिवसेनेने दुसरा क्रमांक पटकावला आहे. शिंदेंच्या शिवसेनेते तब्बल १९ नगरसेवक बिनविरोध विजयी झालेत. कल्याण-डोंबिवलीत भाजपचे सर्वाधिक १४ उमेदवार तर शिवसेनेचे ६ उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे २ तर मालेगावमधून इस्लाम पार्टीच्या एक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.