कोल्हापूर अँटी करप्शनच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर

Spread the love

कोल्हापूर अँटी करप्शनच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर

पोलीस महानगर नेटवर्क

कोल्हापूर : कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरो मध्ये कार्यरत असलेल्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारचा आज पहाटे भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्यासह तिघे जण जखमी झाले आहेत. वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

बेंगळुरूहून कोल्हापूरकडे परतत असताना चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ हा अपघात घडला. वैष्णवी पाटील ज्या इनोव्हा कारमधून प्रवास करत होत्या, ती कार अचानक एका लॉरीला धडकली. धडक इतकी जोरदार होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात कारमधील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघातानंतर जखमींना तातडीने चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी इनोव्हा आणि लॉरी यांच्यातील जोरदार धडकेत ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे कोल्हापूर पोलीस दलासह अँटी करप्शन ब्युरोच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon