संगमेश्वर तालुक्यातून तीन महिला बेपत्ता
पोलीस महानगर नेटवर्क
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांतून तीन महिला बेपत्ता झाल्याची नोंद असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. संबंधित महिलांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
चाफवली (उगवतीवाडी) येथील सुनंदा सखाराम भालेकर (वय ६५) या १६ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेल्यानंतर बेपत्ता झाल्या. त्यांची उंची सुमारे ५ फूट, वर्ण निमगोरा असून केस पांढरे (बॉब कट) आहेत. त्या सावरी साडी (दोन तुकडे) व ब्लाऊज परिधान केलेले होत्या. त्या अल्पभाषी असून गेल्या २८ वर्षांपासून मानसिक आजाराने ग्रस्त असल्याची माहिती आहे.
मौजे साखरपा (गुरववाडी) येथील विजया हरिश्चंद्र लिंगायत (वय ७५) या ३ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ९ वाजता साखरपा येथून बेपत्ता झाल्या. त्यांचा चेहरा उभट, रंग सावळा, उंची ५ फूट २ इंच, बांधा सडपातळ असून त्यांनी आबोली रंगाची सहावारी साडी परिधान केली होती. कानात नकली कुडी, गळ्यात काळा दोरा व पायात साध्या चपला होत्या. त्यांच्या अंगावर कोणतेही दागिने किंवा पैसे नव्हते.
तुळसणी (राउळवाडी) येथील स्वाती चंद्रकांत लोहार (वय ४०) या २० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत बेपत्ता झाल्या. त्यांची उंची ५ फूट २ इंच, रंग गोरा, अंगाने सडपातळ असून केस काळे व लांब आहेत. त्यांनी टॉप व जिन्स परिधान केली होती. त्यांच्या गळ्यात सोनेरी धातूची चैन, कानात नकली टॉप असून उजव्या हाताच्या अंगठ्याच्या वरच्या बाजूस गोंदण आहे. त्यांच्या जवळ रेडमी ९ए कंपनीचा मोबाईल असून त्यात जिओ सिम क्रमांक ९२२६६३८६०१ आहे.
या तिन्ही महिलांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.