बीडमध्ये पुन्हा धक्कादायक कृत्य! खड्डा खोदणाऱ्या मजुराचा गोळी झाडून हत्या; शहरात खळबळ

Spread the love

बीडमध्ये पुन्हा धक्कादायक कृत्य! खड्डा खोदणाऱ्या मजुराचा गोळी झाडून हत्या; शहरात खळबळ

योगेश पांडे / वार्ताहर

बीड – शहरात एका खड्डा खोदणाऱ्या मजुराचा गोळीबारात मृत्यू झाल्याने खबळ उडाली आहे, जुन्या वादातून झालेल्या गोळीबारातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, गोळीबारानंतर आरोपी घटनस्थळावरुन फरार झाले. नगरपरिषदेत रोजंदारीवर काम करणारे कामगार हर्षद शिंदे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरातील अंकुश नगर परिसरात घडली. या गोळीबारात हर्षद यांचा जागीच मृत्यू झाला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे बीड शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील अंकुश नगर परिसरात नगरपरिषदेच्या वतीने खड्डा खोदण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक गोळीबार झाल्याचा आवाज आला. गोळी लागल्याने हर्षद शिंदे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर आरोपी विशाल सूर्यवंशी हा पळून गेल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात पंचनामा करण्यात आला असून मृतदेह पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे बीड मधील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon