मुंब्रा पोलिसांची निवडणुकीपूर्व धडक कारवाई; देशी पिस्टल व जिवंत काडतूसांसह आरोपी जेरबंद

Spread the love

मुंब्रा पोलिसांची निवडणुकीपूर्व धडक कारवाई; देशी पिस्टल व जिवंत काडतूसांसह आरोपी जेरबंद

पोलीस महानगर नेटवर्क

मुंब्रा : महानगरपालिका निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रसाठा रोखण्यासाठी मुंब्रा पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली असून या मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. देशी बनावटीच्या पिस्टलची विक्री करण्यासाठी आलेल्या एका गुन्हेगारास पोलिसांनी शिताफीने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून २ देशी बनावटीच्या पिस्टल तसेच २ जिवंत काडतूस मिळून एकूण ₹३०,३००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुंब्रा पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून कारवाई केली. आरोपी व्यवहारासाठी येताच पोलिसांनी वेगवान हालचाल करत त्याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपी शस्त्रांची बेकायदेशीर विक्रीसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

अटक आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon