चारित्राच्या संशयातून पत्नीच्या खून प्रकरणी आरोपी पतीला जेजुरी येथून बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – चरित्राच्या संशयातून पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करून तिचा खून केल्याप्रकरणी पुण्याच्या इंदापूर वालचंदनगर पोलिसांनी आरोपी पतीला जेजुरी येथून बेड्या ठोकल्या. मल्हारी रोहिदास खोमणे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.याप्रकरणी इंदापूर न्यायालयाने आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.मनीषा मल्हारी खोमणे असं ३५ वर्षीय मृत महिलेचे नाव असून तिचा पती मल्हारी खोमणे याने चारित्र्याच्या संशयातून हा खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय.
इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथे २३ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० च्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर काही तासातच वालचंदनगर पोलिसांच्या पथकाने आरोपीला जेजुरी येथून अटक केली. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार डूणगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी २३ डिसेंबर रोजी पहाटे साडे पाचच्या सुमारास मनीषा खोमणे या अंघोळीसाठी जात असताना पतीने पाठीमागून डोक्यात वार केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी मल्हारी खोमणे त्याचा मोबाईल घरात ठेवून फरार झाला होता.त्याच्या शोधासाठी वालचंदनगर पोलिसांची पथके माळेगाव, जेजुरी, नातेपुते तसेच इतर परिसरात रवाना करण्यात आली होती.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, विजय टेळकीकर पोलीस उप-निरीक्षक, मिलींद मिठापल्ली, ग्रेड पोलीस उप-निरीक्षक रतिलाल चौधर तसेच गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, दत्तात्रय चांदणे, जगदीश चौधर, दादासाहेब डोईफोडे, विकास निर्मळ, महेश पवार, अजित थोरात, गणेश काटकर, किर्तीलाल गायकवाड, रविंद्र पाटमास, विक्रमसिंह जाधव, राहुल माने, गणेश वानकर, ज्योती डिसले या टीमला आरोपीला पकडण्यात यश आलं.