ठाकरे गटात तुफान राडा ! एकमेकांना भिडले ठाकरे गटाचे दोन नेते; एकमेकांना मारहाण
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका आटोपल्या आहेत. आता सर्व जण महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. कल्याण डोंबिवलीतही सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. शिवसेना ठाकरे गटाने आपल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. त्याच ठिकाणी जोरदार राडा झाला. ठाकरे गटाचे दोन नेते एकमेकांना भिडले. त्यांचा वाद इतका टोकाला गेला की एकमेकांना फुटेपर्यंत मारहाण करण्यात आली. पण त्यानंतर दोघांमध्ये अजब पणे समेट ही झाली. या राड्याची जोरदार चर्चा कल्याण डोंबिवलीच्या राजकीय वर्तूळात रंगली होती.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कार्यकर्त्यांच्या मुलाखती सुरू आहेत. त्याच वेळी कल्याणमध्ये गोंधळाची घटना समोर आली आहे. मुलाखतीदरम्यान आपापसातील वादातून ठाकरेंच्या दोन नेत्यांची तुफान हाणामारी झाली. एकमेकांनी एकमेकांना जोरदार ठोसे लगावले. ते इतकी फुटेपर्यंत त्यांनी मारले. यात ते दोन्ही नेते जखमी झाले. कल्याण शहाड शाखा प्रमुख निशिकांत ढोणे आणि भागवत बैसाने यांच्यात ही हाणामारी झाली. या हाणामारीत दोघेही जखमी झाले आहेत. या हाणामारीचा व्हिडीओ ही जोरदार व्हायरल होत आहे.
घटनेनंतर दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पोलिसांनी तत्काळ दखल घेत दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहे. या प्रकरणामुळे कल्याणमधील महात्मा फुले पोलीस स्टेशनबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. दोन्ही नेत्यांचे समर्थक ही मोठ्या संख्येने पोलीस स्टेशन बाहेर जमले होते. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .
पोलीस घटनेचा तपास करत आहेत. नेमका वाद कशावरून झाला, याबाबत चौकशी सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामध्ये सेना व मनसे वरिष्ठ पदाधिकार्यांच्या मध्यस्थी नंतर संपूर्ण वादावर पडदा पडला आहे. ढोणे व बैसाने यांनी गळाभेट घेत हा वैयक्तीक वाद होता. आम्ही मित्र आहोत. दोघे एकमेकांशी मस्करी करत होतो. वाद विकोपाला गेला आणि आमच्यात मारामारी झाली. आता आमच्यात कोणताच वाद नाही सर्व वाद मिटले आहे असे दोघांनी सांगितले आहे.