१७ वर्षाच्या मुलाला सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याचा धाक दाखवत अडीच लाख रूपये किंमतीचे दागिने लुटणाऱ्या टोळीला अटक

Spread the love

१७ वर्षाच्या मुलाला सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याचा धाक दाखवत अडीच लाख रूपये किंमतीचे दागिने लुटणाऱ्या टोळीला अटक

योगेश पांडे / वार्ताहर

छत्रपती संभाजीनगर – तुम्ही १ कोटी रुपयांच्या सोन्याची स्मगलिंग केली असून तुमच्याविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे, अशी भीती दाखवली आणि पोलिस असल्याची थाप मारून अल्पवयीन मुलाकडून एकूण अडीच लाख रूपये किंमतीचे सोन्याच्या दागिने खंडणी स्वरूपात घेतल्याचा प्रकार समोर आली . या प्रकरणात छत्रपती संभाजीनगरमधील जवाहरनगर पोलिसांनी वेदांत राजकुमार राठोड (२२), गौरव ज्ञानेश्वर धनवडे (२१) आणि अमित मनोहर महतो (राजपुत) (२३) या तिघांना ताब्यात घेतले आहे. तर रोहन सुनिल उगले, तेजस्वी विजय पवार हे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणात मनोज जर्नादन चौधरी (४६) यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या १७ वर्षाच्या मुलाला आरोपींनी भीती दाखवत सांगितलं की, तुमच्या घरात एक किलो सोने आहे. तुमच्या विरोधात सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे. तुम्हाला अटक होईल. हे प्रकरण मिटवण्यासाठी खंडणीखोरांनी अल्पवयीन मुलाकडून ३ तोळे २१ ग्रॅमचे सोन्याचे गंठण, तसेच १६ ग्रॅम वजनाचे गहुपोत असे सोन्याचे दागिने खंडणी स्वरूपात घेतले. या प्रकरणात खंडणी घेणाऱ्या गौरव धनवडे, वेदांत राजकुमार राठोड, तेजस्वी विजय पवार, अमित महतो, तसेच रोहन सुनिल उगले या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांच्यासह तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब वाघ, पोलिस अंमलदार मारोती गोरे आणि संदिप बिलारी यांनी तपास करून, या प्रकरणातील आरोपी गौरव धनवडे आणि राजकुमार राठोड यांना ताब्यात घेतले. या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणात आणखी एक आरोपी अमित मनोहर महंतो या तिघांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात खंडणीचे सोने घेतल्या उस्मानपुरा भागातील मेमोरेबल कॅफेचे रोहन उगले आणि तेजस्वी पवार यांचा शोध जवाहरनगर पोलिस घेत आहे.

या प्रकरणात मनोज चौधरी यांचा १७ वर्षाच्या मुलाच्या मोबाईलवर सोन्याचे दागिन्यासह फोटो होते. हे फोटो पाहून त्याच्या ओळखीच्या काही मित्रांच्या मनात सदर मुलाकडे खूप सोने आहे, अशी भावना निर्माण झाली. गौरव धनवडे याने १७ वर्षीय मुलाला गंडवण्यासाठी पूर्ण प्लानिंग केली. तसेच एक किलो सोन्याचा प्लान रचला. या प्लानमध्ये अडकून १७ वर्षीय मुलाने त्याच्या घरातून कोणाला काहीही न सांगता ३ तोळे सात ग्रॅम वजनाचे दागिने खंडणीखोरांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon