कल्याणपूर्वेत साकेत कॉलेजमध्ये ‘नशामुक्त भारत’ व सायबर गुन्हे जनजागृती अभियान

Spread the love

कल्याणपूर्वेत साकेत कॉलेजमध्ये ‘नशामुक्त भारत’ व सायबर गुन्हे जनजागृती अभियान

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण (पूर्व) : कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील साकेत कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स, कल्याण (पूर्व) येथे ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत अमली पदार्थ विरोधी ‘नशामुक्त भारत’ अभियान तसेच सायबर गुन्हे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन आज, शुक्रवारी (दि. ५ डिसेंबर २०२५) सकाळी १०.३० ते १२.४५ या वेळेत करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय अतुल झेंडे (भारतीय पोलीस सेवा), पोलीस उपायुक्त, परिमंडळ ३, कल्याण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. कल्याणजी घेटे (कल्याण विभाग), साकेत कॉलेजचे सचिव श्री. साकेत तिवारी, प्राचार्य श्री. संतोष तिवारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी साकेत कॉलेज, के.डी. कॉलेज व मॉडेल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनाधीनतेचे धोके तसेच सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

सायबर पोलीस स्टेशन, ठाणे येथील पोलीस निरीक्षक श्री. आजगावकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. गणेश न्हायदे तसेच दिशा फाउंडेशनचे श्री. गौतम बेंडकुळे यांनीही विद्यार्थ्यांना अमली पदार्थ व सायबर गुन्हे याविषयी उपयुक्त माहिती देऊन प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे जनजागृती केली.

या कार्यक्रमास सुमारे २०० ते २३९ विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता. विद्यार्थ्यांनी उपस्थित वक्त्यांना प्रश्न विचारून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमामुळे तरुण पिढीमध्ये व्यसनमुक्ती व सायबर सुरक्षेबाबत सकारात्मक जनजागृती होण्यास मोठी मदत झाली असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon