ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत घोडबंदर रोडवरील रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत वाहतुकीत मोठा बदल
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या ठाणेकरांना वाहतूक बदलाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. घोडबंदर रोडवरील कॅडबरी मेट्रो स्टेशनवर रूफ वॉटर ड्रेन टाकण्यासाठी २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर पर्यंत रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. ठाणे शहर वाहतूक शाखेने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
घोडबंदर रोडवरील कॅडबरी मेट्रो स्टेशन या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मेट्रो स्टेशनवर रूफ मेट्रो स्टेशनचे छतवरील पाण्याचा निचरा करण्यासाठी मेट्रो स्टेशनवर रूप वॉटर ड्रेन गटार टाकण्याचे काम २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर पर्यंत करण्यात येणार आहे. सदरचे काम हे ३० टनी मोबाईल क्रेनच्या साह्याने करण्यात येणार आहे.त्यामुळे सदर क्रेन ही मुंबई नाशिक वाहिणीवर कॅडबरी उड्डाण पुलावरील मुख्य वाहिनीवर उभी करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
या काळात नितीन कंपनी ते मोडकबाँर्डे नाका दरम्यान असणाऱ्या पादचारी पुलाच्या ‘प्रवेश द्वार’जवळील संपूर्ण वाहतूक दोन्ही दिशांनी बंद राहील. या दरम्यान, सर्व वाहनांना नितीन कंपनी उड्डाणपुलाच्या चढणीवरून खाली उतरून दुभाजक असलेल्या सेवा रस्त्याचा (सर्व्हिस रोड) वापर करावा लागेल. ही वाहने नितीन जंक्शन/कंदर्बी जंक्शन येथून सेवा रस्त्यावर येऊन,पुढे कोपरीवाडी बाजूने वळून इच्छित स्थळी जातील.
हा पर्यायी मार्ग वापरून वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना (पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने) या नियमांमधून सूट देण्यात आली आहे.