घरखर्चावरून पती पत्नीत भांडणं; कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीने संपवल आयुष्य

Spread the love

घरखर्चावरून पती पत्नीत भांडणं; कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीने संपवल आयुष्य

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची घटना वांद्रे पूर्व परिसरात घडली. नजमा उर्फ नाजो वार्शी आणि नवाब वार्शी अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

बेहरामनगर येथे नवाब हा पत्नी नजमासोबत राहत होता. एक वर्षांपूर्वी ते दोघेही दुसऱ्यांदा विवाहबध्द झाले होते. नवाज हा रिक्षा चालवण्याचे काम करायचा. तो अनेकदा कामावर जात नव्हता. त्यावरून त्याचे पत्नी नजमासोबत खटके उडत होते. घरखर्चाला पैसे देत नसल्याने त्याच्यात गेल्या १५ दिवसापासून वाद सुरु होता. त्यामुळे नजमा ही माहेरी निघून गेली होती. तेव्हा नवाबने तिला घरखर्चासाठी पैसे देण्याचे आश्वासन देऊन घरी आणले होते.

नवाब आणि नजमा यांच्यात काल गुरुवारी पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात त्याने नजमाची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने स्वतःलाही संपवलं. काल सायंकाळी नजमाची आई तिच्या घरी आली. तिने दरवाजा ठोकला. मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने याची माहिती निर्मल नगर पोलिसांना दिली. त्यानंतर काहीच वेळात निर्मल नगर पोलीस घटनास्थळी आले. अग्निशमन दलाच्या मदतीने दरवाजा तोडला. तेव्हा ते दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्या दोघांना सायन रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्या दोघांना मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon