राबोडी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; हरवलेला मोबाईल महिनाभरात शोधून तक्रारदाराला परत
पोलीस महानगर नेटवर्क
राबोडी : राबोडी पोलीस स्टेशनच्या दक्ष आणि तत्पर पथकाने पुन्हा एकदा नागरिकांचा विश्वास जिंकला आहे. तब्बल एक महिन्यापूर्वी हरवलेला मोबाईल शोधून काढत तो तक्रारदाराच्या सुरक्षित ताब्यात देण्यात आला.
तक्रारदाराने केलेल्या तक्रारीवर पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ तपास सुरू केला. तांत्रिक तपास, लोकेशन ट्रॅकिंग आणि सततच्या पाठपुराव्याच्या आधारे मोबाईल शोधण्यात यश आले. अखेरीस मोबाईल मिळवत तो मालकाला परत करण्यात आला.
नागरिकांच्या अडचणींना वेगाने प्रतिसाद देत न्याय व मदत करण्याचा हात पुढे करण्याची भूमिका राबोडी पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. स्थानिक नागरिकांकडून या कार्याचे कौतुक होत आहे.