पुण्यात कोल्हापूरच्या इसमावर गुंगीचे औषध देऊन अत्याचार; महिलेवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : पुण्यातील एका महिलेने कोल्हापूर येथील इसमावर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात आरोपी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरी वांजळे असे आरोपी महिलेचे नाव असून, ती वकील असल्याचे सांगत फिर्यादीला धमक्या देत असल्याची माहिती समोर आली आहे. गुंगीच्या अवस्थेत फिर्यादीचे अश्लील फोटो काढून त्याद्वारे आर्थिक मागण्या केल्याचा आरोप देखील फिर्यादीने केला आहे.
फिर्यादीचा आरोप आहे की, पुण्यातील आरोपी महिलेच्या राहत्या घरी तसेच कोल्हापूर येथील त्याच्या घरी देखील बळजबरीचा प्रयत्न करण्यात आला. घटनेनंतर पीडित इसमाने कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.