मुंबईत ११ लाख दुबार मतदार; ४ लाख मतदारांची नावे अनेक प्रभागांत पुनरावृत्ती
पालिका प्रशासनाची कबुली
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत तब्बल ११ लाख १ हजार ५०५ दुबार नावे असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विविध राजकीय पक्षांनी याबाबत सातत्याने आरोप करत असताना, अखेर पालिका प्रशासनानेही या त्रुटींची कबुली दिली आहे. यामध्ये जवळपास ४ लाख ३३ हजार मतदारांची नावे ही एक-दोन नव्हे तर अनेक वेळा, अनेक प्रभागांमध्ये नोंद झालेली आढळली आहेत.
मुंबईतील एकूण २२७ प्रभागांतील मतदार याद्यांचा अभ्यास केल्यानंतर ही परिस्थिती उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक दुबार नावे ही वरळी विधानसभा मतदारसंघातील एका प्रभागात आढळून आली आहेत. काही व्यक्तींची नावे तर शंभर वेळाही नोंद झाली असल्याचे प्रशासनाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे.
🔴 निवडणूक विभागाकडून माहिती दडपशाही?
गेल्या काही दिवसांपासून निवडणूक विभागाकडून प्रसारमाध्यमांना माहिती न दिल्याने पत्रकारांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर मंगळवारी विभागाने संपूर्ण आकडेवारी सार्वजनिक केली. राजकीय पक्षांनी दुबार नावांवरून प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असताना, विभागाने मात्र याबाबत गोपनीयता पाळल्याचे निदर्शनास आले.
🔴 दुबार मतदारांकडून ‘हमीपत्र’
दुबार नावे असलेल्या मतदारांकडून ते नेमके कोणत्या प्रभागात मतदान करणार याचे हमीपत्र घेतले जाणार आहे. दुबार नावे वगळण्याचा अंतिम अधिकार निवडणूक आयोगाकडे असल्याचेही पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अनेक मतदारांची नावे विविध प्रभागांमध्ये असल्याने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न निर्माण होत आहेत. विरोधकांनी या पार्श्वभूमीवर संपूर्ण मतदार यादीची फेरतपासणी करण्याची मागणी केली आहे.
🔴 मुंबईतील अद्ययावत मतदारसंख्या
एकूण मतदार : १,०३,४४,३१५
पुरुष मतदार : ५५,१६,७०७
महिला मतदार : ४८,२६,५०९
तृतीयपंथी मतदार : १,०९९
दुबार नावे : ११,०१,५०५
मुंबई महापालिकेची प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार असून ५ डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकांची पारदर्शकता आणि विश्वसनीयता सुनिश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.