हदगावमध्ये महिला नायब तहसीलदाराला लाच प्रकरणी रंगेहात अटक, रुपयांची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Spread the love

हदगावमध्ये महिला नायब तहसीलदाराला लाच प्रकरणी रंगेहात अटक, रुपयांची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

हदगाव – स्वस्त धान्य वितरणाशी संबंधित कामासाठी ५,७०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी हदगाव तहसील कार्यालयातील महिला नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

माहितीनुसार, एका स्वस्त धान्य दुकानदारास गेल्या चार महिन्यांच्या धान्यपुरवठ्यावर शासनाने ५७ हजार रुपये कमिशन मंजूर केले होते. त्याचदरम्यान नोव्हेंबर २०२५चा धान्यसाठा मिळाल्यानंतर तो ई–पॉज मशिनवर अपलोड न झाल्यामुळे दुकानदाराला धान्य वाटप करता येत नव्हते. तसेच २७ नव्या लाभार्थ्यांची नावे ऑनलाईन करणे आवश्यक होते. यासाठी दुकानदाराने १८ नोव्हेंबर रोजी पुरवठा निरीक्षक सुमन कऱ्हाळे यांची भेट घेतली

दरम्यान, नायब तहसीलदार व पुरवठा निरीक्षकांनी कंत्राटी संगणक ऑपरेटर गोविंद जाधव याला बोलावून दुकानदाराकडून ५७ हजार रुपये कमिशनवर २० टक्के आणि इतर कामांसाठी लाच मागण्याच्या सूचना दिल्याचे प्रतीचा लाचलुचपत च्या चौकशीत स्पष्ट झाले. दुकानदाराने ही मागणी नाकारत लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार नोंदवली.

तक्रारीची खातरजमा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. त्यानुसार जाधव याने कऱ्हाळे यांच्या सूचनेवरून तक्रारदाराकडून ५,७०० रुपये स्विकारले. त्याच क्षणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. कारवाईदरम्यान त्याचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

हदगाव तहसील कार्यालयातील या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानकडून नायब तहसीलदार कऱ्हाळे व संगणक ऑपरेटर जाधव यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon