२५ वर्षांपासून फरार आरोपी साताऱ्यातून अटक; काळाचौकी पोलिसांची मोठी कामगिरी

Spread the love

२५ वर्षांपासून फरार आरोपी साताऱ्यातून अटक; काळाचौकी पोलिसांची मोठी कामगिरी

सुधाकर नाडार / मुंबई

 

मुंबई : काळाचौकी पोलिसांनी तब्बल २५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला साताऱ्यातून अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे. काळाचौकी पोलीस ठाण्यात गु.र.क्र. १६/१९९२ अंतर्गत भादंवि कलम ३२५, ५०४, ११४प्रमाणे दाखल असलेल्या प्रकरणातील आरोपी विलास गणपत घोरपडे हा गुन्हा नोंद झाल्यानंतर सातत्याने फरार होता. या प्रकरणात माझगावच्या मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, १५ वे न्यायालय यांनी त्याच्याविरुद्ध स्थायी अटक वॉरंट जारी केले होते.

परिमंडळ ४ अंतर्गत सुरू असलेल्या फरार आरोपींच्या विशेष शोधमोहिमेदरम्यान, घोरपडे सातारा जिल्ह्यातील एका भाड्याच्या घरात राहत असल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार १८ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री काळाचौकी पोलिसांचे पथक साताऱ्यात रवाना झाले. अचूक माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

ही यशस्वी कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, मा. पोलीस सहआयुक्त श्री. सत्यनारायण चौधरी, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. विक्रम देशमाने, परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त श्रीमती रागसुधा आर., सहायक पोलीस आयुक्त (भोईवाडा विभाग) श्री. घनःशाम पलंगे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

या मोहिमेत पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगदीश शेलकर, सपोनि चेतन मराठे, पोउपनि संदेश कदम आणि पोलीस शिपाई ओंकार कंक यांनी विशेष परिश्रम घेत संयुक्तपणे ही कारवाई यशस्वी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon