कासारवडवली पोलिसांचा उपक्रम: पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सायबर सुरक्षितता व अंमली पदार्थविरोधी जागरूकता सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – कासारवडवली पोलीस ठाणे व पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, हिरानंदानी इस्टेट यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षितता आणि अंमली पदार्थांविरोधात जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात विद्यार्थ्यांना वैयक्तिक सुरक्षेचे महत्त्व, सायबर धोके व त्यापासून बचावाचे उपाय, संशयास्पद वस्तू वा हालचालींची त्वरित माहिती पोलिसांना देण्याचे महत्त्व तसेच आपत्कालीन Dial 112 च्या योग्य वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमाला ७० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षाविषयक जागरूकता वाढविण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.