हरवलेले मोबाईल मालकांच्या ताब्यात; कोपरी पोलिस ठाण्याच्या महिला कर्मचाऱ्यांचे कौतुक!
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : कोपरी पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस कॉन्स्टेबल कदम यांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने हरवलेले दोन मोबाईल शोधून मालकांना परत दिले. हरवलेल्या मोबाईलपैकी एक Samsung S20 आणि दुसरा Poco कंपनीचा मोबाईल होता.
वेगवान आणि प्रभावी तपासातून मोबाईल शोधून काढल्याने संबंधित नागरिकांनी कोपरी पोलिस ठाणे व ठाणे पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
नागरिकांचा विश्वास — ठाणे पोलिसांची तत्परता!