बालदिन सप्ताहानिमित्त ठाणे पोलिसांचा उपक्रम : विद्यार्थ्यांसाठी ‘सेफ्टी अवेअरनेस सेशन’ला सुरुवात!
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : बालदिन सप्ताहानिमित्त ठाणे पोलीस आणि कॉज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा जनजागृती उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत नौपाडा येथील शिवसमर्थ विद्यालयात “सेफ्टी अवेअरनेस सेशन” घेण्यात आले.
या सत्रात विद्यार्थ्यांना शाळा, घर व सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक खबरदारी, सायबर सुरक्षा, अनोळखी व्यक्तींशी वागताना घ्यायची काळजी, तसेच मदत घेण्यासाठी संपर्क साधण्याचे मार्ग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
बालकांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने ठाणे पोलिसांनी हा उपक्रम राबवला असून, आगामी काही दिवसांत शहरातील इतर शाळांमध्येही अशा जनजागृती सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
ठाणे पोलीस – बालकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर!